जो शिक्षण प्रक्रिया व विद्यार्थी यांच्यामधील महत्वाचा दुवा असतो. एक परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी अध्यापकाने स्वतः परिपूर्ण असायला हवे. आपले अध्यापन कौशल्य वापरून विद्याध्यामधील वाईट गुण वेचून काढून, चांगले गुण स्थापित करणे व ते वृद्धिंगत करता येणे जाले पाहिजे.
यासाठी विद्याभारतीतर्फे अध्यापकांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्यामधील अध्यापन कौशल्य वाढविण्यासाठी कथाकथन, संगीत, विज्ञान, वैदिक गणित, व्यक्तित्व विकास, आकारिक मूल्यमापन इ. विषयांवर त्या त्या विभागातील संस्थेच्या माध्यमातून कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये शिशुवाटिकेतील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन अध्यापकांचे प्रशिक्षण वर्ग नियमितपणे आयोजित केले जातात.